केंद्र सरकारच्या मर्यादित गॅस सिलेंडरच्या धोरणाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यात विरोध करण्यात आला. यावेळी महिलांनी दिवाळीतले फराळाचे पदार्थ चुलीवर बनवले आणि केंद्राच्या वार्षिक १५ गॅस सिलेंडरच्या मर्यादेला विरोध दर्शवण्यात आला. शिवाय, १०५३ रुपये मोजत असूनही वर्षाला १५ सिलेंडरच का? असा प्रश्नही विचारण्यात आला.